Corona Virus : चीनी कंपनीचा डाटा ‘लीक’, ‘कोरोना’ मुळं आत्तापर्यंत झाला 24 हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरस बाबत मोठा खुलासा झाला आहे. चीनची दुसरी सर्वात मोठी कंपनी टेनसेंट चा एक डेटा लीक झाला आहे, त्यामधील कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा समोर आला आहे ते आकडे खूप आश्चर्यचकित करणारे आहेत. या व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास २४ हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तिकडे चीन सरकारने दावा केला आहे की कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ५६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि सोशल मीडियावर हा डेटा व्हायरल झाल्यानंतर कंपनीला आकड्यांमध्ये फेरबदल करावा लागला आहे. या कंपनीने जे आकडे बदलले आहेत ते आकडे चीन सरकारच्या आकड्यांशी मेळ खात नाहीत. दरम्यान चीनमधील कम्युनिस्ट पार्टीने आरोप लावला आहे की कोरोना व्हायरसच्या गंभीरतेला सरकार लपवण्याचे काम करत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार जगभरात विस्तार असलेल्या टेनसेंट कंपनीचा डेटा लीक झाला असून यामध्ये सांगण्यात आले आहे की कोरोना व्हायरसची आतापर्यंत १५४,०२३ लोकांना लागण झाली असून २४,५८९ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. मात्र सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर कंपनीला आपली चूक लक्षात आली आणि कंपनीने हा डेटा काढून टाकला आहे. कंपनीच्या नवीन आकडेवारीनुसार आतापर्यंत १४,४४६ लोक कोरोना विषाणूमुळे पीडित आहेत आणि एकूण ३०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डेटासंदर्भात वापरकर्त्यांमध्ये मतभेद हे स्पष्टपणे दिसत आहेत. काही लोक म्हणतात की कोडिंग च्या गडबडीमुळे टेनसेंटचा हा मूळ डेटा ऑनलाइन लिक झाला होता. काही लोक असेही म्हणाले आहेत की कंपनीच्या एका कर्मचार्‍याने जाणूनबुजून वास्तविक डेटा लीक केला ज्यामुळे जगाला कोरोना व्हायरसची वास्तविक स्थिती अचूकपणे समजू शकेल.

मृतांचा आकडा ५६३ वर पोहोचला
गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या नवीन संशयित प्रकरणांची संख्या कमी झाल्याचा दावा चीनने बुधवारी केला. यामुळे लोकांनी आशा व्यक्त केली आहे की प्रभावी उपायांमुळे त्याचा प्रसार नियंत्रित करण्यात मदत होईल. अशातच देशात मृतांची संख्या ही ५६३ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने हाँगकाँगने म्हटले आहे की, चीनमधून येणाऱ्या सर्व लोकांना शनिवारपासून दोन आठवड्यांसाठी कुटुंबापासून वेगळ्या ठिकाणी देखरेखीखाली राहावे लागेल.

या देशांमध्ये आढळली कोरोना व्हायरसची प्रकरणे
कोरोना व्हायरसचा प्रसार चीनप्रमाणेच इतर देशांमध्येही झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण जपानमध्ये ३४, थायलंडमध्ये २५, सिंगापूरमध्ये २४, दक्षिण कोरियामध्ये १९, ऑस्ट्रेलियामध्ये १४, जर्मनीमध्ये १२, अमेरिकेत ११, तैवानमध्ये ११, मलेशियामध्ये १०, व्हिएतनाममध्ये १०, फ्रान्समध्ये ६ संयुक्त अरब अमिरातीमध्ये ५, कॅनडामध्ये ४, भारतात ३, फिलिपिन्समध्ये ३ (एका मृत्यूसह), रशियामध्ये २, इटलीमध्ये २, ब्रिटनमध्ये २, बेल्जियममध्ये २, नेपाळमध्ये १, श्रीलंकेत १ आणि फिनलँडमध्ये १ अशी प्रकरणे आढळून आली आहेत.