चीननं त्यांचं सैन्य भारताच्या उत्तरेकडे वळवलंय, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीनने आपलं सैन्य भारतासोबतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसीकडे वळवलं आहे, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी केला. हुकूमशाही राष्ट्रांकडून अशा प्रकारची कृत्य केली जातात, असं म्हणत त्यांनी चीनवरही निशाणा साधला. लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या सीमेवर चीन आणि भारताने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. दोन्ही देशांतत्या सीमेवर तणाव वाढल्याचे याद्वारे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्थानिक स्तरावर झालेल्या चर्चेतूनही मार्ग निघालेला नाही.

भारताच्या उत्तरेला सैंन्यांची वाढ
चीनकडून एलएसीवर भारताच्या उत्तरेला सैन्य वाढवलं जात असल्याचे आम्ही पहात आहोत, असं माईक पॉम्पियो यांनी म्हटले आहे. What the hell is going on या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने वुहानमध्ये तयार झालेल्या कोरोना व्हायरसची माहिती जगापासून सुरुवातीला लपवली आणि त्यामुळे एवढं नुकासान झालं. शिवाय या पक्षाने हाँगकाँगच्या नागरिकांचं स्वातंत्र्यही काढून घेतलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चीनच्या विचारधारेचे दोन नमुने
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेचे हे फक्त दोन नमुने आहेत. दक्षिण चीन समुद्रात प्रगती करण्यासाठी त्यांनी बौद्धिक मालमत्ता चोरण्याचे निरंतर प्रयत्न केले आहेत, असा आरोपही पॉम्पियो यांनी केला. अशा प्रकारचे कृत्य साधारणपणे हुकूमशाही राजवटीकडून केली जातात. पण यामुळे चीन आणि हाँगकाँग या ठिकाणी रहात असलेल्या नागरिकांवरच नाही तर जगातील नागरिकावर याचा परिणाम होतो.

अमेरिकेमध्ये विरोधात उभे राहण्याची क्षमता
अमेरिकेमध्ये या विरोधात उभं राहण्याची क्षमता आहे आणि जबाबदारीही आहे. चीनकडून आज जो धोका निर्माण होत आहे, तो अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून सुनिश्चित केला जाईल, असे म्हणत त्यांनी चीनला इशाराही दिला. हे फक्त गेल्या सहा महिन्यांबाबत बोलत नाही तर गेल्या अनेक वर्षापासून चीनने आपल्या लष्करी ताकदीच्या पलिकडे जाऊन बांधणी केली आहे. त्यानंतर कारवाई केली. मी भारताचा उल्लेख केला. तुम्ही दक्षिण चीन समुद्राचा उल्लेख केला असे त्यांनी म्हटले आहे.

चीनचा जगभरात बंदरं उभारण्याचा प्रयत्न
चीनकडून त्यांच्या बेल्ट अँड रोड या प्रकल्पांतर्गत जगभरात बंदरं बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी ठिकाणं निवडली जात आहेत, ज्या ठिकाणी पिपल्स लिबरेशन आर्मी वळवता येईल. लष्करी सैन्याचा विस्तार करण्याचे त्यांचे सातत्याने प्रयत्न आम्ही पाहात आहोत, असं पॉम्पियो म्हणाले.