भारत-चीन नियंत्रण रेषेवरुन वादाचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले कारण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत आणि चीनने मतभेदांवर नियंत्रण ठेवले पाहिजे त्याचे वादात रुपांतर होऊ देता कामा नये असे मत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी व्यक्त केले आहे. वादग्रस्त सीमारेषेवर स्थिरता राखण्यासाटी बांधील असल्याचेही ते म्हणाले आहेत. चीन चर्चेच्या माध्यमातून भारतासोबत वाद मिटवण्यास इच्छुक असल्याचे सांगताना वँग यी यांनी सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावासाठी भारतालाच जबाबदार ठरवले आहे.

वँग यी पाच देशांच्या युरोप दौर्‍यावर आहेत. फ्रान्स आणि जर्मनीलाही यावेळी त्यांनी भेट दिली असून त्यावेळी त्यांनी चीन-भारत संबंधांवरही भाष्य केले आहे. चीन-भारत संबंधांनी गेल्या काही काळात सर्वांचे लक्ष वेधले आहे. नियंत्रण रेषा परिसरात स्थिरता राखण्यासाठी चीन नेहमीच कटिबद्द आहे, असे त्यांनी सांगितले. परिस्थिती अजून बिघडेल असे कोणतेही पाऊल चीन उचलणार नाही.

हो पण आम्ही आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचेही रक्षण केले पाहिजे. चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित केली गेली नाही, त्यामुळे नेहमीच या प्रकारच्या समस्या येतील. भारतासोबत चर्चा करुन समस्यांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचवेळी द्विपक्षीय संबंधांचा प्रश्न येतो तेव्हा या समस्या योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, असं मत वँग यी यांनी व्यक्त केले आहे.