‘तिनं’ दिला जुळयांना जन्म, दोघांचे निघाले वेगवेगळे’बाप’, अशी झाली बेवफा पत्नीची ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात बरीच अशी प्रकरणे समोर येत असतात, त्यापैकी काहींवर विश्वास ठेवणे कठीण असते तर काही प्रकरणे अशक्य असे वाटतात. याआधी आपल्याला देखील असे वाटत असेल की जुळ्या मुलांचा जन्म गर्भाशयातील एका व्यक्तीच्या दोन शुक्राणूंच्या फर्टिलाइज होण्यामुळे होतो. पण चीनमध्ये असे एक प्रकरण घडले ज्याने लोकांना चकित केले. इथल्या एका महिलेच्या जुळ्या मुलांचे दोन वडील असल्याचे समोर आले. या मुलांचा डीएनए रिपोर्ट आल्यानंतर पतीला आपल्या पत्नीच्या व्यभिचाराबाबत समजले.

चीनमधून समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने जगाला चकित केले आहे. इथं एका पतीला आपल्या जुळ्या मुलांच्या डीएनएद्वारे आपल्या पत्नीच्या फसवणुकीबद्दल माहिती मिळाली. आपल्या नवजात मुलांच्या जन्माचा दाखला तयार करताना डॉक्टरांनी त्याला डीएनए चाचणी घ्यावी अशी विनंती केली होती. जेव्हा विश्लेषकाने त्या माणसाला अहवाल दिला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. कारण त्यानुसार त्याच्या जुळ्या मुलांचे दोन वडील आहेत असे समोर आले. एका मुलाचा डीएनए त्याच्याशी जुळत होता, तर दुसर्‍या मुलाचा डीएनए जुळत नव्हता. हा अहवाल पाहून त्या माणसाने आपल्या डोक्याला हात लावला. या व्यक्तीने सांगितले की, माझ्या पत्नीचे दुसऱ्या कुणाशी संबंध असतील यावर माझा विश्वास बसतच नाही.

मुलांची चाचणी घेणारे डेंग यजु म्हणाले की, अशी प्रकरणे 1 कोटीमध्ये एकदाच समोर येतात. त्यांनी असे होण्याची प्रक्रिया लोकांना देखील सांगितली. डेंग यांनी स्पष्टीकरण दिले की असे तेव्हा होते जेव्हा एक महिला एका महिन्यात दोन अंडी रिलीज करते. त्यानंतर कमी वेळातच दोन लोकांशी संबंध बनवते. अशात दोन्ही अंडी वेगवेगळ्या शुक्राणूंसोबत फ्यूज होतात. असे झाल्याने महिला जुळ्या मुलांना जन्म देते परंतु त्यांचे वेगवेगळे वडील असू शकतात. या प्रक्रियेस हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या स्त्रीने एका दिवसात दोन लोकांशी शारीरिक संबंध ठेवले तर त्याचे प्रमाण अधिक वाढते.