चीनी वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, ‘कोरोना’बाबत मोठा गौप्यस्फोट

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या उत्पत्तीचे कारण जाणून घेण्यासाठी WHO ची टीम चीनच्या वुहान शहरात दाखल झाली आहे. चीनने मोठ्या विरोधानंतर या टीमला वुहानमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. मात्र याच दरम्यान एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. चीनमधील रहस्यमय गुफांमध्ये वटवाघुळांचे नमूने घेताना वटवाघुळांनी चावा घेतल्याची कबुली काही चिनी वैज्ञानिकांनी (Chinese scientist ) दिली. चिनी सरकारी टिव्ही चॅनल सीसीटीव्हीवर दोन वर्षांपूर्वी एक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. यात एका चिनी वैज्ञानिकांनी (Chinese scientist ) वटवाघुळांनी आपला चावा घेतल्याचे कबुल केल्याचे दिसून येत आहे. जाणून घेऊ या नक्की काय आहे या व्हिडीओत.

सुरक्षा मापदंडांचे पान न करता काम करण्याचे आरोप वुहान इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीवर अनेकवेळा झाले आहेत. तैवान न्यूजच्या एका वृत्तानुसार 29 डिसेंबर 2017 रोजी सीसीटीव्ही चॅनलवर दाखवलेल्या व्हिडीओमध्ये चिनी लॅबच्या हलगर्जीपणाचे पुरावे सापडत असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ चीनच्या बॅट वूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैज्ञानिक शी झेंगली आणि त्याच्या टीमच्या सार्सच्या ओरिजिनची माहिती घेण्यासाठी तयार केला होता. बायोसेफ्टी लेव्हल 4 ची लॅब म्हणून ओळख असलेल्या वुहान लॅबच्या वैज्ञानिकांनी गुफेत वटवाघुळांना पकडताना हलगर्जीपणा केला. यादरम्यान एका वटवाघुळाने वैज्ञानिकाच्या हाताचा चावा घेतला. खुद्द वैज्ञानिकानंही याची कबुली दिली. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे या टीमचे सदस्य संक्रमित समजल्या जाणाऱ्या बाबी शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून एकत्र पकडताना दिसले. तसेच यादरम्यान कोणीही पीपीई किटदेखील परिधान केले नव्हते.

काय म्हणाला तो वैज्ञानिक
वटवाघुळाला पकडाताना त्याचे विषारी दात हातावर घातलेल्या रबरच्या ग्लोव्हजमधून माझ्या हातात घुसले. त्यावेळी माझ्या हातावर कोणीतरी सुई टोचली असे मला क्षणभर वाटले,असे एका वैज्ञानिकांनी सांगितले. याव्यतिरिक्त त्या व्हिडीओत एक वैज्ञानिक गोल्व्ह्ज शिवाय काम करताना दिसून आला. हे लोकं जिवंत विषाणूवर काम करत होते आणि त्यांनी मास्कदेखील परिधान केल नव्हत. दरम्यान, वटवाघुळान चावा घेतल्यानंतर हाताला सुज आल्याचंही वैज्ञानिकानं व्हिडीओमध्ये दाखवल आहे. याव्यतिरिक्त वटवाघुळांमध्ये कशाप्रकारे घातक विषाणू असतात हेदेखील तोच वैज्ञानिक सांगताना दिसत आहे. याव्यतिरिक्त या गुफेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आल्याचेही वैज्ञानिकाने सांगितले.