OPPO चा 5G साठी Vodafone शी करार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनची मोबाइल कंपनी Oppo ने 5G सेवेच्या जगभरातील सर्व्हिसेससाठी Vodafone शी करार केला आहे. सध्या जगभर 4जी सेवा वापरली जाते. त्याहून कितीतरी पट वेगवान इंटरनेट पुरवणारी 5जी सेवा अद्याप सगळीकडे उपलब्ध नाही. चीनची ओपो कंपनी जगातील बहुतकरून सर्व महत्त्वाच्या देशांमध्ये आपले मोबाईल विकते आणि विविध सेवा देते. या कंपनीने आता 5 जी सेवा देण्यासाठी व्होडाफोनशी करार केला आहे. दोन्ही कंपन्या मिळून जगभर ही सेवा पुरवणार आहेत.

ही सेवा सुरू झाल्यावर मोबाईलमध्येही प्रचंड वेगवान इंटरनेट वापरता येणं शक्य होणार आहे. व्होडाफोनचं जगभरात असलेलं नेटवर्क मोठं आहे. या नेटवर्कचा फायदा ओपोला होणार असून, ओपोसारख्या आघाडीच्या चीनी ब्रँडच्या इतर सुविधांचा फायदा व्होडाफोन कंपनीला होणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी उत्तम सेवा दिल्यास त्यांना पछाडणं अवघड होणार आहे.