India-China Standoff : भारतीय सैनिकांना घाबरले चिनी सैनिक, लडाखमध्ये झाली पोस्टिंग तर लागले रडू, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमध्ये कित्येक महिन्यांपासून भारत-चीन सीमा विवादांमुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने एलएसीवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. भारतीय सैनिकांबद्दल चिनी सैनिकांमध्ये बरीच भीती आहे. शेजारील देशाचे सैनिक घाबरले आहेत की, लडाखमधील भारत-चीन सीमेवर त्यांची तैनाती होणार आहे हे जेव्हा चिनी सैनिकांना समजले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सोशल मीडियावर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चा रडण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, चिनी सैनिकांच्या रडण्यामागचे कारण लडाखमध्ये त्यांची होणारी तैनाती आहे.

पाकिस्तानी कॉमेडियन जैद हामीदने २२ सप्टेंबर रोजी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये काही चिनी सैनिक बसमध्ये बसलेले दिसत आहेत. ते सर्व रडत आहेत, कारण त्यांची पोस्टिंग लडाखच्या सीमेवर होणार आहे. एका वृत्तानुसार, बसमधील चिनी सैनिक पीएलएचे “ग्रीन फ्लावर्स इन द आर्मी” हे गाणेही अतिशय अवघडपणे गाऊ शकत आहेत.

हा व्हिडिओ सर्वप्रथम व्युचॅटच्या फुयांग सिटी साप्ताहिकाच्या पृष्ठावर अपलोड केला गेला होता, परंतु नंतर तो तेथून काढला गेला. ओरिजिनल फुटेजमध्ये यिंगझोऊ जिल्ह्यातील फुयांग सिटीचे दहा नवीन सैनिक दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सर्व नवीन भरती कथितपणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होती आणि त्यापैकी पाच जणांनी तिबेटमध्ये सेवा देण्यासाठी स्वतः निवड केली होती.

तैवानच्या एका वृत्तानुसार, हा व्हिडिओ कथितपणे फुयांग रेल्वे स्थानकावर शूट केला गेला होता, जेव्हा सैनिक हुबेई प्रांतातील एका लष्कर शिबिरात जाण्याची तयारी करत होते. एका चिनी युजरने ट्विटरवरही व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे.

भारत-चीनमध्ये झाली कोअर कमांडर स्तराची चर्चा
काही महिन्यांपासून चाललेल्या भारत-चीन संघर्षात निर्माण झालेल्या तणावाच्या दरम्यान सोमवारी दोन्ही बाजूंनी कोअर कमांडर-स्तरीय चर्चा झाली. जवळपास १३ तास चाललेल्या या चर्चेनंतर संयुक्त निवेदन देण्यात आले होते. विधानानुसार, दोन्ही देशांनी एलएसीच्या पुढील भागात आणखी सैन्य तैनात न करण्याचे मान्य केले आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही गैरसमजात न येण्याचे आणि तणाव स्थिर करण्याबाबतही सहमती दर्शवली आहे.