‘कोरोना’ महामारीचं संकट चालू असतानाच जगातील सर्वात ‘खोल’ ठिकाणी पोहचलं चीन, बनवलं ‘हे’ रेकॉर्ड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन सतत जगाला आश्चर्यचकित करत आहे. आधी कोरोना पसरवून, नंतर सैन्य ड्रिल करून. कधी अंतराळात रॉकेट सोडून तर कधी भारताच्या सीमेवर कब्जा करून. आता तर चीन जगातील सर्वात खोल ठिकाणी पोहोचला आहे. चीनने आपली पाणबुडी जगातील सर्वात खोल ठिकाणी पाठवून एक नवीन विक्रम नोंदविला आहे.

चीनने आपला डीप-सी सबमर्सिबल हायदोउ-1 (Haidou-1) जगातील सर्वात खोल ठिकाणी असलेल्या मरियाना ट्रेंच (Mariana Trench) पर्यंत पोहोचवला आहे. हायदोउ-1 मरियाना ट्रेंचच्या 10907 मीटर म्हणजेच 35,784 फूट खोलीपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी त्याने 10 हजार मीटर म्हणजेच सुमारे 33 हजार फूटची खोली मोजली.

हायदोउ-1 ने 23 एप्रिल रोजी पहिली डुबकी लावली. यानंतर त्याने चार डुबक्या लावल्या. 9 मे रोजी तो मरियाना ट्रेंचच्या संपूर्ण खोलीचे मोजमाप करुन समुद्रातून बाहेर आला. चिनी शास्त्रज्ञांनी डिस्कवरी शिपवर हायदोउ-1 ला ठेऊन त्यास मरियाना ट्रेंचच्या वर घेऊन गेले. मग त्याला समुद्रात सोडण्यात आले. हायदोउ-1 ने केवळ मरियाना ट्रेंचची खोलीच मोजली नाही तर त्याच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग देखील केली. या मानवरहित पाणबुडीने समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या अनेक प्राण्यांचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवले.

हायदोउ-1 ने पहिल्यांदा 10,802 मीटर, दुसऱ्यांदा 10,863 मीटर, तिसऱ्यांदा 10,884 मीटर आणि चौथ्यांदा 10,907 मीटरची खोली मोजली. चिनी अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शेनयांग इंस्टिट्यूट ऑफ ऑटोमेशनने ही पाणबुडी तयार केली आहे. ही एक रिमोट कंट्रोल्ड पाणबुडी आहे. या पाणबुडीचे सर्व आर्म्स देखील रिमोटने चालतात. चीनने मरियाना ट्रेंचमध्ये हायदोउ-1 ला हाय-प्रेसिशन एकॉस्टिक पोझिशनिंग सिस्टम आणि एअरबोर्न मल्टी-सेन्सर इन्फॉर्मेशन फ्यूजन पद्धतीद्वारे पोहोचविले होते.