‘कोरोना’ व्हायरस चीनव्दारे मानव निर्मित, माझ्याकडे पुरावा ! चीनी वैज्ञनिक महिलेचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीनवर कोरोना व्हायरस संकटावरून लागोपाठ प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेपासून युरोपातील अनेक देश या धोकादायक व्हायरसच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार ठरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चीनच्या महिला वायरॉलॉजिस्ट, ज्या चीनी सरकारच्या धमकीनंतर अमेरिकेत येऊन राहात आहेत, त्यांनी कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा केला आहे.

वायरॉलॉजिस्ट लि-मेंग यानचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, जे त्या लवकरच सादर करतील. लि-मेंग यानने चीन सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, या व्हायरसबाबत चीन खुप काही लपवत आहे. मी विश्वासाने सांगू शकते की, हा एक चीनद्वारे मानवनिर्मित व्हायरस आहे. माझ्याकडे याबाबतचे पुरावे आहेत आणि ते मी सिद्ध करेन.

लि-मेंग यानने म्हटले, कोरोना वुहानच्या मीट मार्केटमधून आलेला नाही. कारण हे मीट मार्केट एक स्मोक स्क्रीन आहे, ते व्हायरस प्रकृतीचे नाही. जर हा व्हायरस वुहानच्या मार्केटमधून आलेला नाही तर अखेर त्याची उत्पत्ती कशी झाली, असे विचारले असता लि-मेंग यांनी म्हटले की, हा जीवघेणा व्हायरस वुहानच्या लॅबमधून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे.

त्यांनी म्हटले की, या व्हायरसचा जीनोम अनुक्रम एका मानवी फिंगर प्रिंटप्रमाणे आहे आणि याच आधारावर त्या सिद्ध करतील की तो एक मानवनिर्मित व्हायरस आहे. त्यांनी म्हटले की, कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी फिंगर प्रिंटची उपस्थिती हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की, याची उत्पत्ती मानवाने केली आहे.

लि-मेंग म्हणाल्या, तुम्ही जीवशास्त्र वाचत नाही, तरी सुद्धा तुम्ही याच्या आकारावरून या व्हायरसची उत्पत्ती ओळखू शकाल. या दरम्यान चीन सरकारवर गंभीर आरोप करताना त्यांनी म्हटले की, धमकीनंतर मी हाँगकाँग सोडून अमेरिकेत आले, परंतु माझी सर्व वैयक्तिक माहिती सरकारी डेटाबेसवरून नष्ट करण्यात आली आणि माझ्या दोन सहकार्‍यांना अफवा पसरवण्यास सांगितले आहे.

लि-मेंग यांनी म्हटले, सरकार मला खोटे ठरवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे, तर खूनाचा आरोप सुद्धा लावत आहे, परंतु मी माझ्या लक्ष्यापासून विचलित होणार नाही. लि-मेंग यांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसचा अभ्यास करणार्‍या पहिल्या काही शास्त्रज्ञांपैकी त्या एक होत्या. डिसेंबर 2019 च्या अखेरीस त्यांनी दावा केला होता की, विद्यापीठात त्यांच्या पर्यवेक्षकाने एसएआरएस सारख्या प्रकरणाच्या एका विषाणू गटाला पाहण्यासाठी सांगण्यात आले होते, जो चीनमध्ये उत्पन्न झाला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मी प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि लवकरच सिद्ध करेन की कोरोना व्हायरस मानवनिर्मित आहे.