चीनची भिंत धोक्यात ?  

बीजिंग : वृत्तसंस्था – चीनची भिंत धोक्यात असताना दिसत आहे. लांबच लांब असलेली आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक अशी चीनची भिंत कोसळू लागल्याचं समोर आलं आहे. या भिंतीचा 30 टक्के भाग तुफान पाऊस आणि वादळामुळे कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल जिओग्राफिकनेही याबाबत माहिती दिली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आणि भिंतीच्या तुटलेल्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी चीन सध्या ड्रोनची मदत घेत आहे. 6450 किलोमीटर लांबीची ही भिंत सध्या धोक्यात असल्याचे समोर आले आहे.
भिंत वाचवण्यासाठी  चीन अ‍ॅथॉरिटी कामाला लागली आहे. सध्या हजारो मजूरही या कामासाठी झटत असताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे चीन अ‍ॅथॉरिटीने तुटलेल्या भिंतीचा एक नकाशा तयार केला आहे. याची एकत्रित माहिती संग्रहित करून ती भिंत वाचवणार्‍या मजुरांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. या भिंतीला वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणार्‍या मजुरांना याचा फायदा होणार असून त्यांना तिथेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.  शांशी प्रातांतील दाई काउंटीमध्ये यानमेनजवळ या भिंतीचा काही भाग यापूर्वी पडला होता. प्रचंड पावसाच्या तडाख्याने भिंत पडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
हेब प्रांतामध्ये या चीनच्या भिंतीची निर्मिती करण्यात आली आहे. 6450 किलोमीटर लांब असणारी ही भिंत  1368 ते 1644 या दरम्यान तयार करण्यात आली आहे.  ही भिंत कोरियन सीमेपासून गोबी डेझर्टपर्यंत पसरलेली आहे.