home page top 1

हिंदी महासागरामध्ये चीनची युध्दनौका, नौदलाचा प्रत्येक हालचालीवर ‘वॉच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. भारतीय नौदलाला भारतीय जलसीमेजवळ एक चीनी युद्धनौका आणि पाणबुडी आढळून आली आहे. भारतीय नौदलाच्या पाळत ठेवणाऱ्या विमानाने या चिनी युद्धनौकांचे फोटो काढले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदलाने सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

नौदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात प्रवेश करणाऱ्या सर्व जहाजांवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष असते. नौदलाच्या विमानाने गस्त घालत असताना या युद्धनौकांचा मागोवा घेतला आहे. नौदल पी -8 आय गुप्तचर विमानाने हिंदी महासागरातील चीनच्या युद्धनौका शियान -32 चा यशस्वीपणे मागोवा घेत फोटोही काढले आहेत. ह्या चिनी युद्धनौका थोड्याच वेळात श्रीलंकेच्या मल्लकाच्या समुद्रधुनीत गेल्या.

या घटनेची माहिती मिळताच नौदलाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच संबंधित सीमा संरक्षण विभागांना सावध केले आहे.

Loading...
You might also like