पोरीनं खाल्लं ‘वटवाघूळ’, त्यामुळंच जगभरात पसरला का ‘कोरोना’ व्हायरस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आता भारतापर्यंत पोहचला आहे. मुंबईत दोन संशयास्पद घटना घडल्या आहेत. या क्षणी, त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत चीनमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूमुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८३० लोक संक्रमित आहेत.

दरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून असा दावा केला जात आहे की, वटवाघूळ खाल्लेल्या चिनी मुलीकडून कोरोना विषाणूचा प्रसार झाला होता. एका वृत्तसंस्थेनुसार, एका मुलीने वटवाघूळ खाल्ल्याचे आणि तिचा सूप प्यायल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसह हा मॅसेज व्हायरल होत आहे की, वटवाघूळ खाल्ल्यानंतर मुलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे, जो लोकांमध्ये पसरला आहे.

त्याच वेळी, एका चिनी वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की कोरोनाव्हायरस साप आणि वटवाघूळच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरला आहे. चीनच्या वुहानमध्ये अशा प्राण्यांची बाजारपेठ आहे. जिथे साप, वटवाघूळ, मारमोट्स, पक्षी, ससे इत्यादी विकले जातात. चीनमधील लोक या प्राण्यांना खातात.

वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की SARS (Severe Acute Respiratory Syndrome) व्हायरस, जो वटवाघूळपासून पसरतो, तो सापांद्वारे लोकांमध्ये पसरतो. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वुहानसह ९ शहरे बंद असल्याचे माहिती आहे. वुहानमध्ये ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like