Chinkara Deer Killed In Pune | वन राज्यमंत्री भरणेंच्या इंदापुर तालुक्यात गोळ्या झाडून चिंकारा हरणांची शिकार?, पुणे जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur) चिंकारा जातीच्या हरणांची शिकार (Chinkara Deer Killed In Pune) करण्यात आली आहे. छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणांना जागीच जायबंदी करुन दोन चिंकारा हरणाची शिकार (Chinkara Deer Killed In Pune) केली. त्यानंतर आरोपी हरणांना गाडीत घालून पसार झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील लोक अभयवन कडबनवाडी वनक्षेत्रात (Lok Abhayavan in Kadbanwadi forest area) घडली आहे. वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne, Minister of state forest) यांच्या मतदारसंघातच शिकारीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

शनिवारी (दि.18) सकाळी सहा वाजता अलिशान चारचाकी गाडी भरधाव वेगाने आली. त्यांनी जवळ असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणांची शिकार करत गाडीत घालून पलायन केलं.

प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले की, शेतातून येत असताना मोठा आवाज झाल्याने मी वनीकरणातील चार चाकी वाहनाकडे पाहिले.
त्यावेळी त्यातून बंदुकीतून हरणाला गोळ्या झाडल्याचे दिसले.
त्या गाडीतील तिघेजण खाली उतरले आणि मग हरणास गाडीत टाकून नेले.
तर तिथेच दुसऱ्या 100 फुटाच्या आतच असलेल्या दुसऱ्या एका शेतातील कामगारानेही दुसऱ्या चिंकाराची शिकार करताना पाहिले.

या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिंकारा हरणांची संख्या असून हे वैभव वाचवण्यासाठी मागील वीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत.
या शिकऱ्यांचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार (Bhajandas Pawar) यांनी सांगितले.

शिकार झाली या ठिकाणच्या परिसराचा पंचनामा केला असून येथीलच एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे वाहन दिसत आहे.
तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तातडीने तपास करु असे इंदापुर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी (Ajit Suryavanshi) यांनी सांगितले.

Web Titel :- Chinkara Deer Killed In Pune | chinkara deer killed in state forest minister dattatray bharne indapur taluka pune by hunters with firing bullets?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price | सोनं मिळतंय 11000 रुपयांनी ‘स्वस्त’, पुन्हा कमाईची संधी; जाणून घ्या 2021 अखेरपर्यंत किती होणार दर

7th pay commission | राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या

Cash Management | सॅलरी घेणार्‍यांसाठी ‘कॅश मॅनेज’ करणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या सर्वात प्रभावी ‘या’ 10 पद्धत