चिन्मयानंद प्रकरण : विद्यार्थिनीनं आणि तिच्या मित्रानं केलं ‘हे’ चुकीचं काम, एका SMS मुळे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थीनी आणि तिचा मित्र संजय यांना शोधणे पोलिस पथकासाठी मोठे आव्हान होते कारण त्यांचे मोबाईल नंबर बंद केलेले होते. फक्त एका मेसेजमुळे राजस्थानच्या दौसामध्ये पोलिस पथक यशस्वी झाले नाहीतर हा तपास करणे अत्यंत अवघड बाब होती ज्याने पोलिसांची डोकेदुखी आणखीन वाढली असती.

असा घेतला मुलीचा शोध :
वास्तविक दिल्लीला पोचताच विद्यार्थिनीने एका अज्ञात नंबरवरून तिच्या आईला फोन केला होता. पोलिस पथकाने सर्वप्रथम त्या क्रमांकाचा शोध घेतला आणि पोलिस ज्या तरूणाच्या मोबाइलवरून बोलली होती त्या युवकाकडे पोलिस पोहोचले. ते दिल्लीतील हॉटेलमध्ये राहिले असल्याचे मोबाईलच्या माध्यमातून उघडकीस आले.

संजयचे आयडी कार्ड आणि विद्यार्थीनी व संजयचे CCTV फुटेज शोधल्यानंतर दोघे कोणत्या गाडीतून बाहेर पडले याची पोलिसांना माहिती मिळाली. गाडीच्या क्रमांकाच्या आधारे, गाडी कोठे-कोठे गेली हे शोधले. पुढील चौकशीत असे आढळून आले की तीन दिवसांपूर्वी या गाडीची सर्व्हिसिंग करण्यात आली होती. पथकाने त्या ठिकाणी पोहोचून कार चालवणाऱ्या ड्रायव्हरचा नंबर घेतला. मोबाईल नंबर बंद केल्यामुळे हे कठीण झाले होते.

एक दिवस अगोदर दौसा येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम मधून ड्रायव्हरने पैसे काढल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०-१५ वाजता संजय आणि विद्यार्थीनी थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्या हॉटेलमधून दोघांचा शोध घेण्यात आला. मुलीला सुरक्षित शोधणे पोलिसांसमोर एक आव्हान होते, जर विद्यार्थ्यासोबत काही अनुचित घडले असते तर आरोप थेट स्वामी चिन्मयानंद यांच्यावर गेला असता आणि त्यानंतर पोलिसांना तपासात आणखी त्रास झाला असता.

नैमिश पीठाचे संत चिन्मयानंदसमवेत :
संत समाज आणि नमिश पीठ यांचे प्रणेते नारानंद सरस्वती आश्रमाचे ज्ञानी महाराज म्हणाले की, एका षडयंत्रांतर्गत चिन्मयानंद यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. या प्रकरणात शेकडो नैमिश पीठ त्यांच्या बरोबर उभे आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की जर मालिश करणे हा गुन्हा होता तर मोठ्या शहरांमध्ये मसाज केंद्रे सुरू करून सरकार कर का आकारत आहे ? ते म्हणाले की जे संत चिन्मयानंदांना विरोध करणारे लोक केवळ बोटांवर मोजण्याइतके आहेत. स्वामींकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुलीला तुरुंगात पाठवन्याची मागणी त्यांनी केली.

Visit : policenama.com

You might also like