‘हा’ भाजपा नेता व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन करत होता ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा नेता चिन्मयानंद यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिडित विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनीने एसआयटीला १२ पानी जबाब दिला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तिच्या म्हणण्यानुसार चिन्मयानंद हा तिला ब्लॅकमेल करीत होता. ती रहात असलेल्या होस्टेलमधील बाथरुममध्ये तिच्या आंघोळीचा व्हिडिओ त्याने बनविला होता. हा व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करीत होता. त्याचबरोबर तिच्यावर बलात्कार करतानाचाही व्हिडिओ त्याने बनविला असल्याचे तिने ह्या जबाबात म्हटले आहे. चिन्मयानंद तिला जबरदस्तीने मसाज करायला लावायचा.

Image result for chinmayanad

 

एसआयटीने ही पिडित मुलगी रहात होती त्या होस्टेलच्या रुमची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी पाच तास चाललेल्या या तपासणीत एसआयटीबरोबर फॉरेन्सिकचे तज्ञही उपस्थित होते. होस्टेलमधील ही रुम पोलिसांनी सील केली होती.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like