चिन्मयानंद प्रकरण : विद्यार्थीनीचा आणखी एक व्हिडिओ आला समोर, झाले धक्‍कादायक खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिन्मयानंद प्रकरणामध्ये एसआयटीने कारवाई केल्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांनी स्वतः आपले कारनामे काबूत केले होते. मात्र आता या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. विद्यार्थिनीचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर चिन्मयानंद यांच्या वकिलांनी विद्यार्थिनीवर कट कारस्थान केल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थिनी जेव्हा आपल्या गाडीतून ब्लॅकमेलिंगवाला संदेश पाठवल्याचे बोलत होती त्यावेळी विद्यार्थिनी असे देखील म्हणाली की मी तर मोदींचे देखील सिम कार्ड चोरू शकते.

त्यामुळे या विद्यार्थिनीच्या एकूणच बाबींवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी सांगितले की विद्यार्थिनीने दोन व्हिडिओमध्ये शारीरिक शोषण झाल्याचे बोलत आहे परंतु तीने जे फेसबुकवरून आपले फोटो टाकले आहेत त्यात ती थोडेसीही पीडित वाटत नाही.

वकिलांनी सांगितले की, स्वामींना बदनाम करण्याचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे षडयंत्र अनेक दिवसांपासून सुरु आहे. अनेकदा विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता आणि यात ती यशस्वी देखील झाली आणि तिने कारस्थान करून स्वामींना अडकवले. गेल्या एक वर्षांपासून ही विद्यार्थिनी स्वामींना ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कयादायक खुलासा ओम सिह यांनी केला.

Visit : policenama.com