Chinmayi Sumit | ‘मराठी शाळाच टिकल्या नाही तर मराठी पाट्या कशा वाचता येणार’ अभिनेत्री चिन्मयी सुमितचा सरकारला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chinmayi Sumit | दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीतच लावल्या पाहिजे असा कायदाच नुकताच राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. त्यानिमित्ताने मराठी शाळांच्या स्थितीकडे मराठी शाळा संघटनांनी सरकारचे लक्ष वेधले. तर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय स्वागताहार्य आहे. पण मराठी शाळाच टिकल्या नाही तर मराठी पाट्या कशा वाचता येतील ? असा सवाल या मोहिमेच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित (Chinmayi Sumit) यांनी केला आहे.

चिन्मयी सुमित (Chinmayi Sumit) म्हणाल्या की, ”मराठी पाट्यांचा निर्णय होणे गरजेचे होतेच पण मराठी शाळांचा विषय अधिक महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत चालले आहे. गेल्या 10 वर्षातील मुंबई महानगरपालिका हद्दीतील मराठी शाळांची आकडेवारी पाहिली तर मराठी पाटी आणि देवनागरी लिपी पुढील पिढी वाचू शकेल का ? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

130 मराठी शाळा बंद पडल्या –

पालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दशकभरापासून घटू लागली आहे. तब्बल 130 शाळा बंद पडल्या असून 65 टक्क्यांनी विद्यार्थी संख्या घटली आहे. 2010-11 पासून मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या 67,033 ने घसरली आहे. मराठीचा कास धरून राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकल्या. मग मराठीच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले का उचलली नाहीत असेही त्या म्हणाल्या.

मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे (Sushil Shejule) म्हणाले की, ”मराठी भाषेचा मराठी शाळा कणा आहे. त्या टिकल्या तरच मराठी टिकेल. वर्षानुवर्षे मराठी शाळांचे प्रश्न सुटत नाहीत. किंबहुना मराठी शाळांना मान्यता मिळत नाही. मुंबईत ज्या मराठी शाळा आहेत त्याचे इंग्रजीकरण सुरु आहे. इतकच नाही तर मराठी शाळेत शिकलेल्यांना नोकरीही नाकारली जाते. त्यामुळे भविष्यात पाट्या असतील पण वाचणारे कोणी नसतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title : Chinmayi Sumit | if marathi schools do not survive then how will marathi boards be read question marathi actor chinmayi sumit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार