थेऊर ग्रामपंचायतीवर चिंतामणी 10 तर महातारीआई 7 जागी विजय

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –   थेऊर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेसाठी आज झालेल्या मतमोजणीत चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकून आपली सत्ता कायम ठेवली असून प्रतिस्पर्धी महातारीआई ग्रामविकास पॅनेलने सात जागेवर विजय मिळाला आहे.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथील ग्रामपंचायतीचे कारभारी निवडीसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान झाले आज दुपारी मतमोजणी करण्यात आली यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडूरंग रामचंद्र काळे व प्रभाकर काकडे राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे याच्या नेतृत्वाखाली चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने प्रभाग दोन मधील दोन जागी प्रभाग तीन मध्ये दोन जागी तसेच प्रभाग चार मधील तीन व प्रभाग सहा मधील तीन जागी अशा दहा जागी विजय मिळवून आपली सत्ता कायम ठेवली तर माजी सरपंच महादेव काकडे व नवनाथ काकडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे यांच्या नेतृत्वाखालील महातारीआई ग्रामविकास पॅनेलने प्रभाग एक मध्ये तीन प्रभाग दोन मध्ये एक व प्रभाग पाच मध्ये तीन अशा सात जागी विजय मिळविला.

प्रभाग एक

1)संतोष काकडे (महातारीआई पॅनेल )
2)गणेश गावडे (महातारीआई पॅनेल)
3) चंद्रकला शिर्के (महातारीआई पॅनेल)

प्रभाग दोन

1) संजय काकडे (महातारीआई पॅनेल)
2) शशिकला कुंजीर (चिंतामणी पॅनेल)
3) रुपाली रसाळ (चिंतामणी पॅनेल)

प्रभाग तीन

1) विठ्ठल काळे (चिंतामणी पॅनेल)
2) मंगल धारवाड (चिंतामणी पॅनेल)

प्रभाग चार

1) आप्पासाहेब काळे (चिंतामणी पॅनेल)
2)गौतमी कांबळे (चिंतामणी पॅनेल)
3) राहुल कांबळे (चिंतामणी पॅनेल)

प्रभाग पाच

1) जयश्री कुंजीर (महातारीआई पॅनेल)
2) पल्लवी साळुंखे (महातारीआई पॅनेल)
3) मनिषा कुंजीर (महातारीआई पॅनेल)

प्रभाग सहा

1) युवराज काकडे (चिंतामणी पॅनेल)
2)सिमा कुंजीर (चिंतामणी पॅनेल)
3) शितल काकडे (चिंतामणी पॅनेल)