‘चिंटू चाचा’ ऋषी यांनी सैफसोबत गायलं होतं ‘मैं शायर तो नहीं…’ ! ‘बेबो’ करीनानं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या ‘भावना’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांनी गुरूवारी (दि 30 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर पूर्ण कपूर कुटुंब आता दु:खात आहे. ऋषी यांचे कुटुंबीय आणि चाहते सतत त्यांच्या काही आठवणी शेअर करताना दिसत आहेत.

ऋषी कपूर यांची पुतणी करीना कपूर हीदेखील चिंटू चाचा गेल्यानंतर खूप दुखी आहे. काकांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर ती त्यांना शेवटचं पाहण्यासठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यांच्या अंतिम संस्कारातही ती सहभागी झाली होती. करीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ऋषी आणि सैफ अली खान यांचा हा व्हिडीओ आहे. हम तुम सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. या सिनेमातील हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, ऋषी कपूर त्यांचं फेमस हिट साँग मैं शायर तो नहीं हे गाणं गात आहेत. हम तुम या सिनेमात राणी मुखर्जीनंही काम केलं आहे. हम तुम सिनेमातील एका गाण्याच्या सीनचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पोस्ट करताना करीनानं हार्ट इमोजीही पोस्ट केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.