Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं (व्हिडीओ)

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील ‘टशन’ चिपी विमानतळावर (Chipi Airport Inauguration) पहायला मिळाले. विमानतळाच्या कोनशिलेच्या (Chipi Airport Inauguration) अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार (Ajit Pawar), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार केला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. मात्र, ना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्याकडे पाहिले ना राणेंनी ठाकरे यांच्याकडे. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रसंग उपस्थितांना पहायला मिळाला.

…पण असे घडलेच नाही !

चिपी विमानतळाच्या (Chipi Airport Inauguration) कोनशिला अनावरण साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचं विमान चिपीवर दुपारी 12.30 च्या सुमारास लँड झाले.
पालकमंत्री उदय सामंत (uday samant), स्थानिक नेते आणि मंत्री जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांनी दोघांचे स्वागत केले.
पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले.
त्यानंतर काही वेळातच नारायण राणे कार्यक्रमाच्या स्थळी आले.
त्याठिकाणी उद्धव ठाकरे-राणे एकमेकांना नमस्कार करुन स्मितहास्य करतील, अशी शक्यता होती. मात्र असे काही घडलेच नाही.

 

16 वर्षांनी दोन कट्टर विरोधक एका मंचावर

उद्धव ठाकरे व नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एका मंचावर आले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण राज्याने पाहिलं.
परंतु आज चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी दोन्ही नेत्यांनी आपल्यातील वैर बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद साधतील अशी चर्चा होती.
परंतु दोघांनीही एकमेकांकडे पाहिले तर नाहीच शिवाय संवाद देखील साधला नाही.

 

Web Title : Chipi Airport Inauguration | minister narayan rane cm uddhav thackeray didnt even loo at each other sindhururg chipi airport inauguration program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ‘पुरस्काराचे मानकरी म्हणजे सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे दूत’ – उल्हास पवार

Women Heart Problems | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेगळे दिसतात हृदयरोगाचे ‘हे’ 5 संकेत! जाणून घ्या

NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या