चिपळूनमध्ये भिडे गुरुजीविरोधात जोरदार निदर्शने

चिपळून : पोलीसनामा ऑनलाईन

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची आज (बुधवारी) चिपळूनमधील चितळे मंगलकार्यालयात सभा घेण्यात आली होती. या सभेला स्वत: भिडे गुरुजी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर भिडे गुरुजींच्या विरोधात संभाजी ब्रिगेड, आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांनी निदर्शने करुन कार्यालयाबाहेरील सर्व रस्ते आडवले. तसेच काही वेळ भिडे गुरुजी मंगलकार्यालयात अडकून पडल्याने चिपळूनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात भिडे गुरुजींना बाहेर काढण्यात आले.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b99f847-a62a-11e8-b5ad-c534efca958f’][amazon_link asins=’B01DDP7D6W’

शिवप्रतिष्ठान संघटनेने बुधवारी चिपळुणातील चितळे मंगल कार्यालयात सभेचे आयोजन केले होते. ही सभा खासगी असल्याचे सांगून पत्रकारांना सभागृहात प्रवेश दिला नव्हता. सभा संपण्याच्या वेळेस चिपळुणमधील संभाजी ब्रिगेडसह आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांचे कार्यकर्ते सभागृहाबाहेर जमले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. पाचशेहून अधिक कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले. यावेळी भिडे गुरुजींच्या विरोधात घोषणाबाजी करत भिडे गुरुजींना चिपळुणातून बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा जमावाने दिला. कार्यकर्त्यांनी यावेळी हातात आंबे घेऊन निदर्शनेही केली. दरम्यान, सभागृहाच्या बाहेरील दोन्ही रस्ते संभाजी ब्रिगेड, आंबडेकरी संघटना आणि बहुजन संघटनांनी रोखून धरले आहेत.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7027be61-a62a-11e8-8450-fd180a925ab1′]

भिडे गुरूजींची चिपळूण येथील सभा बंदिस्त सभागृहात असल्याने त्याला पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता नाही त्यामुळे विविध संघटनांकडून सभेवर बंदी घालण्याची केलेली मागणी मान्य करता येणार नाही मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.