‘लोक जनशक्ती पार्टी’त देखील ‘घराणे’शाही, मुलाला बनवलं पक्षाध्यक्ष

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जमुई मधून खासदार म्हणून निवडून आलेले आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांची मंगळवारी लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रामविलास पासवान हे देखील उपस्थित होते.

2014 मध्ये रामविलास यांनी चिराग यांना लोजपाच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष केले होते. यानंतर पाच वर्षातच त्यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी चिराग यांनी उमेदवार निवडीमध्ये विशेष लक्ष घातले होते.

रामविलास पासवान यांनी मुलाकडे नेतृत्व देत म्हंटले की आता पुढच्या पिढीने ही जबाबदारी सांभाळायची आहे. चित्रपट क्षेत्रात अपयशी झाल्यानंतर चिरागने राजकारणावर लक्ष द्यायला सुरुवात केली होती. 2013 मध्ये चित्रपट क्षेत्राला राम राम ठोकत चिराग यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

चिराग रामविलास यांचे एकुलते एक पुत्र आहेत. 2019 मध्ये बिहारमधील जमुई मधून लोकसभा लढवून ते निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रित समता पार्टीचे भूदेव चौधरी यांचा पराभव केला होता.

Visit : Policenama.com