दाक्षिणात्य सिनेसृष्टीला ‘नजर’अंदाज केल्यामुळे ‘मेगास्टार’ चिरंजीवींची सून ‘नाराज’, PM मोदींना नम्रपणे विचारला ‘हा’ प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने अवघे बॉलीवूड एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी दाक्षिणात्य एकही कलाकार उपस्थिती न राहिल्यामुळे दक्षिणचे मेगास्टार चिरंजीवी यांची सून उपासना कोनिडेला यांनी पंतप्रधानांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

उपासना यांनी दाक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीला गिणतीत न धरल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्विट करत याबाबत आपले मत व्यक्त केले आहे, त्या म्हणतात प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्ही दक्षिणेकडे राहणारे लोक सुद्धा तुमचे गुणगान गात असतो आणि पंतप्रधान म्हणून आम्हाला असे व्यक्तिमत्व भेटले म्हणून गर्व सुद्धा करतो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये केवळ बॉलीवूडचे लिडिंग कलाकारच दिसून आले. दाक्षिणात्य कलाकारांना यांनी पूर्णतः वेगळे ठेवले आहे. त्यामुळे मी माझ्या या भावना आपल्यासमोर व्यक्त करत असल्याचे उपासना यांनी सांगितले.

चिरंजीवी हे साउथचे मेगास्टार आहेत त्यांच्या कुटुंबात सर्वच जण कलाकार आहेत. त्याचे बंधू पवन कल्याण मुलगा राम चरण हे दोघेही अभिनेते आहेत. त्यातच उपासना या साउथच्याच अपोलो ग्रुपचे संस्थापक प्रताप रेड्डी यांची नातं आहे.

या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी बॉलीवूड कलाकारांसोबत गांधीजींच्या कार्याला नव्या पद्धतीने लोकांपर्यंत कसे पोहचवता येईल यावर चर्चा केली. यावेळी अनेक कलाकारांनी मोदींच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले.

Visit  :Policenama.com

You might also like