Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल, म्हणाल्या – ‘प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Chitra Wagh | बिबवेवाडी (Bibvewadi) येथे मंगळवारी सायंकाळी आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकेची झोड उठवली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सावित्रीच्या लेकी राेज बळी पडतायत यांच्यासाठी सरकार कधी महाराष्ट्र बंद करतयंत असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. एवढच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीही (priyanka gandhi) यांच्यावर ही हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीटमध्ये असे म्हंटले आहे की, अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून, टाईप करतानाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तिने,
कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलीस कायदे कागदावर… महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?”
असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रियंक गांधी यांच्यावर टीकास्त्र केले.
हाथरसच्या घटनेवर तुम्हाला अश्रु अनावर झाले. मग पुण्याच्या घटनेवर गप्प का? पुण्यात ज्या तरुणीची हत्या झाली ती तुमच्या मुली समान नाहीये का? फक्त निवडणूका लागल्या कीच उत्तर प्रदेशातच तुमच्या संवदेना जाग्या होतात ? असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली.

 

कबड्डीचा सराव करणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर तरूणाने कोयत्याने सपासप वार करून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
क्षितिजा अनंत व्यवहारे असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती मित्र मैत्रिणींसोबत कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी त्या ठिकाणी एक तरूण तेथे आला.
त्याने क्षितिजाला बाजूला बोलावून तिच्याशी बोलत होता. दरम्यान, त्याच्यात वाद झाल्याने त्या तरूणाने सोबत आणलेल्या काेयत्याने क्षितिजावर सपासप वार केले.
तिचा जागेवरच मृत्यू झाला. वार केल्यानंतर त्या तरूणाने तेथे काेयता टाकून पळ काढला.
या संशयिताजवळ पिस्तूल होते अशीदेखील माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title : Chitra Wagh | bjp chitra wagh slams congress priyanka gandhi over pune crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parineeti Chopra | परिणीती चोप्रानं माऊंट एव्हरेस्टला पहात शेअर केला फोटो, म्हणाली – ‘तुम्ही मला विनम्रतेची शिकवण दिली’

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले – ‘…तर रॉयल्टी म्हणून त्यांना 200 ते 300 कोटी सहज मिळतील’

Tata Motors च्या शेयरमध्ये 5 दिवसात 42% ची तेजी, आजच 20% वाढला; जाणून घ्या गुंतवणुकीची रणनिती