Chitra Wagh | ‘आम्हलाही आरे ला कारे करण्याची भाषा येते’, चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिली ‘वॉर्निंग’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) चांगल्याच संतापल्या आहेत. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आम्हीही ‘आरे ला कारे’ करु शकतो, असा थेट इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं. त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा कार्यभार सोपविण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना, राणे यांची राजकीय कारकिर्द पाहताना त्यांना छोटं खातं दिलं, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता. तसेच प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यासारखा ज्येष्ठ व अनुभवी मोहरा पडल्याचं आश्चर्य व्यक्त करत स्मृती इराणी यांचे मंत्रिपद कायम राहिल्याबद्दल तिरक्या शब्दात मतं मांडलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) प्रदेशच्या उपाध्यक्षा आणि भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना ताकीद दिली आहे.

 

संजय राऊत यांना थेट ‘वॉर्निंग’


ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना थेट वॉर्निंग दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, आपण काल स्मृती इराणींबद्दल जे बरळलात… मुळात पहिले तुमच्या चमचेगिरीचा आणि ‘सामना’च्या संपादकपदाचा काय संबंध आहे ? ते सांगा. मग मी तुम्हाला त्यांच्या आणि त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा काय संबंध आहे याबाबत खुलासा देईन. आणि आपणास एक स्पष्ट सांगायचे आहे की संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी ‘आरे ला कारे’ करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

म्हणून शिवसेनेला ते झेपलं नाही
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले.
नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. ती उंची वाढतच राहणार आहे.
म्हणूनच शिवसेनेला ते झेपलं नाही.
असे मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूंना (सुनिल राऊत) लवकरच मंत्रिपद मिळेल,
जेणेकरुन आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल,
असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Web Titel :- chitra wagh bjp gives warning to shivsena mp sanjay raut over female self respect issue

 

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम