Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | पुण्यातील महिलांवर होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यामधील बंडगार्डन परिसरात (Bundgarden Area) मुलींसोबत गैरप्रकाराच्या (Misbehaving With Girls) एक दोन नाही तर तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे महिला सुरक्षेचा (Women’s Safety) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

छेडछाड, अश्लील कृत्य आणि विनयभंग, पुण्यातील बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सर्व प्रकारच्या अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ आहेत पण त्यांना सत्ताधाऱ्यांनी खंडणी वसुलीतून मोकळीक दिली तर ना, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

 

बंडगार्डन परिसरात पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) करणाऱ्या ग्रुपमधील तरूणीची एका ग्रुपने छेड काढली.
त्यानंतर याच परिसरातील एका हॉटेलमध्ये 19 वर्षाच्या तरूणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर तिसरी घटना तर अत्यंत भयंकर आहे.

 

 

स्वारगेट (Swargate) ते विश्रांतवाडी (Vishrantwadi) या बसने प्रवास करत असलेल्या
मुलीच्या कमरेला जाणीवपूर्वक बस कंंडक्टरने हात लावत विनयभंग (Debauchery) केला. प्रशांत गोडगे असं कंडक्टरचं नाव आहे.
त्यामुळे अशा समाजकंटकांना पोलिसांचा धाक राहिला नाही की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh angry reaction regarding crime in pune bundgarden area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

 

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे

 

Pune Aam Aadmi Party | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी पुण्यात ‘आप’कडून भाजपचा निषेध