Chitra Wagh | भास्कर जाधवांवर टीका करताना चित्रा वाघ यांची जीभ घसरली; ‘नाच्या’ उल्लेख करत म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पोटनिवडणुकीचा (Andheri by-Election) वाद आता निकालात निघाला असून, राज्यात नवीन वाद सुरु झाला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (दि.18) कुडाळ तालुक्यात वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्च्यात भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटावर (Shinde Group) मोठे आरोप केले होते. त्याला भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव पूर्वी देखील नाच्याचे काम करत होते आणि आता देखील तेच करत आहेत, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. यावेळी त्यांची जीभ घसरली.

 

भास्कर जाधव पूर्वी देखील नाच्याचे काम करत होते आणि आता देखील तेच करत आहेत. तुम्ही तेच काम करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी (Pooja Chavan) मी लढत होते, त्यावेळी तुम्ही कोणत्या बिळात शिरला होता. कि तोंडाला लकवा मारला होता तुमच्या? तुमच्या सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाहीतर, आम्ही आमच्या जीवावर लढतो, अशी घाणाघाती आणि आक्षेपार्ह टीका चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली.

 

कुडाळ तालुक्यात स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते. वैभव नाईक यांच्यावर सध्या लाचलुचपत विभागाची (ACB) चौकशी सुरु आहे. त्याचा निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप, नारायण राणे (Narayan Rane) आणि पुत्र, चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा समाचार घेतला.

ज्यावेळी पूजा चव्हाण प्रकरण गाजत होते.
त्यावेळी या प्रकरणात आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) हेच दोषी असल्याचे आरोप भाजप करत होता.
भाजपने संजय राठोड यांच्या विरोधात रान उठवले होते. चित्रा वाघ या सर्वात केंद्रस्थानी होत्या.
रोज सकाळी टिव्हीसमोर येऊन त्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे न्यायाची मागणी करत होत्या.
पण तेच राठोड शिंदे यांच्या बंडासोबत भाजपमध्ये मंत्री झाल्यावर मात्र चित्रा वाघ काही बोलत नाहीत, असे भास्कर जाधव म्हणाले होते.

 

Advt.

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh criticize shivsena leader bhaskar jadhav see video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

Sanjay Raut | संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयाबाहेर भेट; खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा…

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना