Chitra Wagh | ‘अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा धुर काढलाय’; चित्रा वाघ यांचा ‘महाविकास’ ला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. राज्यकर्ते आरोप – प्रत्यारोप करत असताना पाहायला मिळत आहेत. अशीच एक टीका महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली होती. या टीकेला भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra  Wagh) यांनी प्रत्युत्तर देताना चांगलाच समाचार घेतला आहे. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा धुर काढलाय’, असे म्हणत चित्रा वाघ (Chitra  Wagh) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) टोला लगावला आहे.

 

‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ अशी टीका करत महाविकास आघाडीने भाजपला डिवचले होते.
यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra  Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय ! आरे, एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धुर काढलाय,
आता तिघांनाही समजलं आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय,
असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

शिरुर (Shirur) तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (Talegaon Dhamdhere) येथे महिला मेळाव्यात (BJP Mahila Melava) त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
त्या म्हणाल्या, राज्यसभेच्या दोन जागा तर येणारच मात्र तिसरी जागाही निवडुन येणार आहे.
राज्यात सरकारी दवाखान्यात (Government Hospital) सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरत आहे.
राज्यातील मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाही तर गोरगरीबांनी कसा विश्वास ठेवायचा ?
असा सवालही त्यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

 

आघाडीची गोडी कडू झाली
मुख्यमंत्री (CM) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चिमटा काढताना चित्रा वाघ म्हणाल्या, पुढचा मुख्यमंत्री आमचाच म्हणणाऱ्या राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीची गोडी कडू झाली आहे.
परंतु सत्तेसाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी ही गोडी घेत आहेत.
राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना आघाडी मधील नेत्यांना पुढचा मुख्यमंत्री कोण याची स्वप्न पडत आहेत,
ही दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | BJP leader chitra wagh criticizes mahavikas aghadi government statement on devendra fadnvis in talegaon dhamdhere shirur taluka of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा