Chitra Wagh | ‘राऊतांची कोल्हेकुई, नवाब मलिक दाऊद का भाई’ – चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Chitra Wagh | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन होऊन दोन वर्ष झाली. यानंतर सत्ताधारी आघाडी सरकारवर भाजप (BJP) अनेक कारणास्तव ताशेरे ओढत आहेत. यातच आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘दोन नंबरी सरकारची दोन वर्ष, आघाडी सरकारची ही काळी कमाई,’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे.

 

त्यावेळी बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, ‘दोन नंबरी सरकारची दोन वर्ष, वसूलीची घाई परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, दोन नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई, असं कवितेच्या स्वरुपात त्यांनी टीका केली आहे. तर, चित्रा वाघ यांनी ट्विटमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर असा निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या दोन वर्षापासून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक कारणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील अनेक घडामोडीवरुन भाजप आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहे.

 

Web Title : Chitra Wagh | bjp leader chitra wagh crustose on mahavikas aghadi government on 2 years complete

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले भांडण, म्हणाला – ‘तुझ्यापेक्षा शंभर टक्के…’

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध