Chitra Wagh | ‘शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session) सुरु झालं आहे. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप (MVA and BJP) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावेळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी म्हणजे काल (गुरुवारी) शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा हा कायदा मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे.

 

 

‘शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे, हे आमदार अजय चौधरी (Shiv Sena MLA Ajay Chaudhary) यांच्या विधानातून दिसून आलं आहे. त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा,’ असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत चर्चा झाली.
यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले.
त्यावेळी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी भाजपला झोंबणारे विधान केले होते. याच मुद्द्यावरुन चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.
तर, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) प्रत्येक माता-भगिनीचा आदर झाला पाहिजे, असे म्हणाले. यात पक्षीय राजकारणही येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
पण, भाजप महिला पदाधिकारी एरवी जरासे काही झाले की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात.
मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, अशी विचारणा अजय चौधरी यांनी केली होती.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh demands according shakti act first offense should be filed against shiv sena mla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा