Chitra Wagh | आशिष शेलारांना धमकी मिळाल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | मागील दोन दिवसांपुर्वी भाजपचे नेते (BJP) आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची चर्चा आहे. ही धमकी फोनवरुन दिली गेली होती. तसेच धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळते. यानंतर शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती. धमकी प्रकारवरुन आता भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत. राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे 24 तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे.

पुढे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, ‘आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराविरोधात विखारी भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का ? राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

‘जे जे भाजपाचे नेते पुढे येऊन सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर राज्यात सरकार आहे का हा प्रश्न निर्माण होतो,’ अस देखील त्या म्हणाल्या

Web Title : Chitra Wagh | bjp leader chitra wagh got angry after receiving threats from ashish shelar wagh said CM still in holiday mood, Home Minister in weekend mood ‘

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय