Chitra Wagh | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘…यातच तुमचा फोलपणा कळतो’

0
228
Chitra Wagh bjp leader chitra wagh on cm uddhav thackeray about hindutva
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भावनिक शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली आहे.. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी तर अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त ? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही.’ असं म्हणत शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येण्यासाठी साद घातली आहे. “शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. असं देखील ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संवादावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी निशाणा साधला आहे.

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी ट्विट मधून त्यांनी म्हटलं आहे की, “गेल्या अडीच वर्षात सारखं सारखं ‘हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही’, असं सांगावं लागतं. यातच तुमचा फोलपणा कळतो,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही खासदार, आमदार अलीकडेच अयोध्येला जाऊन आलेत. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल,” असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहेत.

 

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय.
ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे.
जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन.
पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन.
मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे.
पण एकदा मला समोर येऊन सांगा.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh on cm uddhav thackeray about hindutva

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा