Chitra Wagh | ‘एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब’ – चित्रा वाघ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chitra Wagh | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यामधीलही (Goa Election) निकाल (Result) स्पष्ट होताना दिसत आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) युती केली होती. मात्र या युतीची जादू गोव्यात चालली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी निशाणा साधला आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोव्यात भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. तर त्यांच्यासोबत त्यावेळी भाजपचे इतर नेतेही होते. याचाच धागा पकडत चित्रा वाघ यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब…यह तो सिर्फ अंगडाई है…. अब महाराष्ट्र की बारी, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली आहे. सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा हा परिणाम आहे. शिवसेनेच्या गोवा, युपीतील सगळ्या उमेदवारांचं डिपॉझीट (Deposit) जप्त होतांना दिसत आहे. झुकेगा नही, जब तक महाराष्ट्र (Maharashtra) में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करतां.. इति सर्वज्ञानी, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

 

दरम्यान, गोव्यामध्ये भाजप आघाडीवर असलेलं पाहायला मिळत आहे.
तर त्या पाठोपाठ काँग्रेसही (Congress) शर्यतीत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला (NCP) गोव्यात यश मिळेल अशी आशा सर्वांना होती.

 

Web Title :- Chitra Wagh | BJP leader Chitra Wagh On Goa Elections Results Shivsena MP Sanjay Raut NCP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा