Chitra Wagh | ‘चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’ – चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी नुकतंच केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचं दिसत आहे. नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊत यांच्यावर सडकून टिका केली आहे. याच्यानंतर आता भाजपच्या नेत्या (BJP) आणि नुकतंच भाजप राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, महाविकास आघाडीला आयटी आणि (सक्तवसुली संचालनालय) ED ची एवढी भिती का वाटतीये सर्वज्ञानी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) बोलण्यातून चोराच्या मनांत चांदणं’ दिसतंय, असा घणाघात चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
तर, केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय..
हे ‘अलीबाबा अन् चाळीस चोरांचं’ सरकार..चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल.
असं चित्रा वाघ म्हणाल्या.

काय म्हणाले होते राऊत?

ED, CBI, NCB आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना.
मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांना देखील जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा.
त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती.

हे देखील वाचा

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला जमा होईल PM Kisan चा 10 हप्ता, जाणून घ्या रजिस्ट्रेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : chitra wagh | bjp leader chitra wagh on shivsena mp sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update