Chitra Wagh | कावळा काव काव करत राहीला पण कोकीळेला न्याय मिळाला!, न्यायालयाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज जाहिर केला असून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) वाचले आहे. सगळं बेकायदेशीर असलं तरी सरकार कायदेशीर असल्याचे निकालातून समोर आले आहे. असं असताना भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत विरोधकांना डिवचलं आहे. ‘कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला’, असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
कोकिळेला न्याय मिळाला

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि
सगळ्या विरोधकांना डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की
कावळा कोण आणि कोकिळा कोण हे निकालातून कळेल. आता हे सिद्ध झालंच, कावळा कोण आणि कोकिळा कोण? कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला. लोकशाहीचा हा विजय. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार, असं म्हणत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केलं आहे.

ही लोकशाहीची हत्या नाही का ?

पंतप्रधान मोदीजींचा (PM Narendra Modi) फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले आणि नंतर काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीच्या (NCP) मांडीला मांडी लावून बसले…तेंव्हा उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला. ही लोकशाहीची हत्या नाही का? बरं सुप्रीम कोर्टानं स्पष्टच केलंय, तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री करता येणार नाही. म्हणजे चूक तुमचीच, शस्त्र तुमच्या हातात…हत्या तुम्हीच केली आणि आता लोकशाहीच्या नावाने गळे काढताय. केवढा हा निर्लज्जपणा, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

Web Title :-  Chitra Wagh | BJP leader chitra wagh reaction on supreme court verdict on maharashtra political crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर, खटला मोठया घटनापीठाकडे जाणार; शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार

Abdul Sattar | ‘झिरवळांचा खेळ आता संपला’, संजय राऊतांच्या ट्विटला अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती