Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप (Raghunath Kuchik Rape Case) करणाऱ्या तरूणीने आता थेट भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. पीडित तरूणीने केलेल्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

रघुनाथ कुचिक प्रकरण पीडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरं तर वाईट वाटलं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभी राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार असल्याचं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे.

 

या मुलीचीही पूजा चव्हाण (Pooja Chavan Case) होऊ नये यासाठी मी तिला मदत केली. मात्र हे सगळं करून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझा आवाज बंद कराल तर तुमचा गैरसमज आहे. मुलीने माझ्यावर आरोप केल्यावर सगळ्या पुढे आल्या. याआधी सगळ्या कुठे होत्या?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

दरम्यान, आता मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलीने मारलेली पलटी हा नवा अनुभव आहे.
माझी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे. मी तिला मदत केली ही माझी चूक झाली का ?, असं चित्रा वाघ म्हणाल्या. आता या प्रकरणात आणखी काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | BJP leader chitra waghs first reaction after the victim allegations in raghunath kuchik case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा