Chitra Wagh | भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –  लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या (Lakhimpur violence) विरोधात महाविकास आघाडी सरकारने आज (सोमवार) महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली. या मुद्यावरुन भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली असताना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येई की नाही माहित नाही, पण राज्यात महिला अत्याचाराची लाट येत असल्याचे म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

विठू माऊली सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी मावळ आयोजित लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी चित्रा वाघ बोलत होत्या.

राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, महाविकास आघाडीचं हे सरकार (Maha Vikas Aghadi government) लोकधार्जिणे नसून, त्यांच्या आमदार, खासदार आणि बगल बच्च्यांसाठी हे सरकार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे माहिती नाही, पण राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे.
अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही.
राज्यात कोणालाच धाक नाही. संजय राठोड (sanjay rathod) सारख्या बलात्काऱ्याला (Rape) आणि सरकारमधील भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना वाचवण्याचं पाप हे सरकार करत आहे, असा घणाघात त्यांनी केला.

 

…मग त्यावेळी महाराष्ट्र बंद का केला नाही ?

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवत आहात.
मग ज्या मावळात (Maval) आपण बसलोय त्याच मावळमधील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यावेळी
तीन शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले.
त्यावेळेस महाराष्ट्र बंद का नाही केला? असा सवाल करत आमच्या संवेदना त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade), भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे (Ganesh Bhegade), तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे (Ravindra Bhegade),
माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, शांताराम कदम, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, जि.प. सदस्या अलका धानिवले, नितीन मराठे,
विठु माऊली सोशल फाऊंडेशनचे संस्थापक किरण राक्षे, एकनाथ टिळे, बाळासाहेब घोटकुले,
पांडुरंग ठाकर, सरचिटणीस सुनिल चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title : Chitra Wagh | BJP’s Chitra Wagh criticizes Maha Vikas Aghadi government on maharashtra band

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुणे महापालिकेची शहर सुधारणा समिती झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’ ! नियमांची ‘ओढाताण’ करून बोलविलेल्या खास सभेत ‘विषयांना’ मंजुरी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3033 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 91 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी