Chitra Wagh | व्हायरल व्हिडिओवरुन चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या – ‘…असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप (Government Employees Strike) पुकारला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी (दि.20) विधान भवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्यानंतर संप (Government Employees Strike) मागे घेण्यात आला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडिओवर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

संपात भाग घेतलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. यावरुन चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत हा पंतप्रधान आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करत संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण..?? संपातील 1 महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..!

मोर्चा…आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेले हत्यार आहे. पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल. फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवल… इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले. हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का ??, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

 

पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी. सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळषडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे.
नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे.
आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे! अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
देवेंद्र फडणवीस कदाचित मनाचा मोठेपणा दाखवतील पण आम्ही क्षमा करणार नाही आणि
खपवून तर मुळीच घेणार नाही..!, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh angry over govt women worker pm modi and devendra fadnavis statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?