Chitra Wagh | संजय राऊतांच्या ‘त्या’ टिकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या- ‘कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळताना पाहायला मिळत आहे. तसेच राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी सामनातून केली आहे. संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर केलेल्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) सध्या भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी दिल्लीत असून त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही. हे आता त्यांच्या कृतीतून आणि लेखणीतून जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलण्यास अर्थ नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र आहे. याठिकाणी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा नाही हे प्रत्येक जण जाणतो, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

शिवसेनेने नेमकी काय केली होती टीका?

महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा (Witchcraft), करणी, टाचण्या,
लिंबू-मिरची इत्यादी अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे. सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व
सरकारी कार्यालयात होत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार गुवाहाटीत
कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) मंदिरात गेले. त्याठिकाणी त्यांनी जादूटोण्याचे विधी केले,
रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले.
पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेण्यासाठी गेले, अशा शब्दात शिवसेनेकडून टीक करण्यात आली होती.

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh reaction on shivsena sanjay raut criticism on eknath shinde superstition