Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा वाद सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली होती. त्याप्रकरणी त्यांनी महिला आयोगास देखील लक्ष केले होते. त्या म्हणाल्या होत्या की महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली. मात्र उर्फीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप त्यांनी महिला आयोगावर केला होता. त्यावर राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीवर उत्तर दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी ट्वीट करत कळवली आहे.

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘खुल्या समाजातील उघडा नंगानाच आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वैराचार, याविरोधातील माझा लढा असाच सुरू राहील. आपण समाजाचं देणं लागतो, हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव टिकवून ठेवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही, तर कृतीतून दिसायला हवं.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

तसेच त्या (Chitra Wagh) आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहितात, ‘महिला आयोगाचा कायम सन्मान आहे.
त्यांच्या नोटीसचं उत्तर दिले आहे. तसेच त्यापुढे त्या म्हणाल्या मला नोटीस दिली गेली आणि
ते जाहीर केलं गेलं आणि दिलेली नोटीस वितरीत केली गेली.
तसेच मी दिलेले उत्तर सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही.
असेही त्या महिला आयोगावर बोलताना म्हणाल्या. त्याचप्रमाणे स्वैराचाराला लगाम घालणे,
ही फक्त माझीच जबाबदारी नाही, तर कायद्याने स्थापित झालेल्या महिला आयोगाची देखील आहे.
तसेच माझा याबाबतचा लढा सुरूचं राहणार आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून दिली.

 

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh replied to notice given by state women commission after allegation in urfi jawed case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान