Chitra Wagh | ‘संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी आपला डीएनए तपासावा’, दंगलीवरुन चित्रा वाघ यांचा घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर मधील संदल उरुसच्या मिरवणुकीत काही तरुणांनी मुघल बादशहा औरंगजेबाचे (Aurangzeb) पोस्टर झळकावत नाच केला होता. तसेच त्यांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापले असताना कोल्हापूरात (Kolhapur Violence) मोठा राडा झाला. या दोन घटनांवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या दोन्ही घटनांवरुन महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) बोट दाखवले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

 

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले की, राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागली आहे. ती ज्यांनी जन्माला घातली आहे त्यांचा म्हणजे महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए (DNA) आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, हे सगळं ठरवून केलं जातंय, यासाठी त्यांनी कट केला आहे. परंतु हे जनताही पाहत आहे.
‘ये पब्लिक है, ये सब जानती है’. महाविकास आघाडीचे नेते सर्वज्ञानी संजय राऊत (Sanjay Raut) आणि
जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा,
ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :  Chitra Wagh | chitra wagh slams sanjay raut jitendra awhad over riots in maharashtra aurangzeb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा