Chitra Wagh | जालना जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, पोलिसांत तक्रार द्यावी’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. त्यावेळेचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला वर्षभर ब्लॅकमेल केले गेले. आरोपींनी हा आक्षेपार्ह व्हिडीओ पिडीतेच्या पतीला पाठवला आणि त्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, त्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी, त्यामुळे असे प्रकार रोखले जाऊ शकतात, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

 

कोणत्याही महिला किंवा मुलीवर अत्याचार झाल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांत तक्रार केली पाहिजे.
आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाचा तपास जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक करत आहेत.
त्यामुळे लवकरच आणि निश्चितपणे आरोपींना अटक केली जाईल. जर तेव्हाच पोलिसांत तक्रार केली असती,
तर अनर्थ टळला असता, असे यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत.

 

या घटनेमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
आणि हे कृत्य करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

Web Title :- Chitra Wagh | Chitra Wagh’s reaction to the incident of torture in Jalna district, said – ‘Girls and women should not hide their torture, report to the police’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss 16 | सुम्बुल तौकीर खानच्या वडिलांनी तिला दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या नक्की काय म्हणाले…

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली ‘हि’ खास पोस्ट; पोस्ट व्हायरल

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ