Chitra Wagh In Pune | महिला मोर्चाने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे – भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh In Pune | ‘आपण अडीच वर्षे विरोधात होतो आता आपण सत्तेत आहोत त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे . महिला मोर्चाने सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी झटून त्यांना न्याय दिला पाहिजे’ असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. (Chitra Wagh In Pune)

पुणे शहराच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप व महिला मेळावा आज संपन्न झाला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर , वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, मंजुषा नागपुरे,रुपाली धाडवे, रंजना टिळेकर यांच्या सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते. (Chitra Wagh In Pune)

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, महिला ही शंभर घरे जोडू शकते रोजचे दैनंदिन प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महिला आघाडीच्या पदाधिकाराऱ्यानी केले पाहिजे कामातून माणूस मोठा होतो पदाने माणूस मोठा होत नाही त्यामुळे काम हे एकजुटीने केले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे बोलताना म्हणाले की, आजची महिला ही सक्षम आहे
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडते महिला अघडी
हा पक्षातील सर्वात महत्वाचा घटक असून पुढच्या काळात महिला सक्षमीकरण ,
सबलीकरण या विषयात शहर भा ज पा काम करणार आहे’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस गायत्री खडके यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

Jitendra Awhad | बेरोजगारीच्या मुद्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, ”बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर…”

NCP MLA Rajesh Tope | राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, एका राजकीय नेत्यावर आरोप करत नोंदवला निषेध

Journalist Sanjay Agarwal | ज्येष्ठ पत्रकार संजय अगरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रसार माध्यम व प्रसिद्धी विभाग समन्वयक पदी नियुक्ती