Chitra Wagh | उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का?, उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा आक्रमक (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उर्फी जावेद ही सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असतात. तिच्या अशा प्रकारच्या कपड्यांवर आणि अर्धनग्न फिरण्यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतला होता. यावरुन चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवरुन झालेली हमरीतुमरी सर्वांनीच पाहिली आहे. अशात चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात बोलताना महिला आयोगाला (State Commission for Women) सवाल केले आहेत. उर्फी जावेदच्या उघडनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विचारला आहे.

माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही, तर…

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत महिला आयोगावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, महिला आयोगाची फक्त भाषा नको आहे तर कृती हवी आहे. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उघडनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अत्यंत बीभल्सपणे रस्त्यावर फिरते आहे. महिला आयोगाने याचा जाब का विचारला नाही? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही. तर तिच्या उघड्यानागड्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या आणि किळसवाण्या विकृतीला असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाचं समर्थन आहे का?

ज्या पद्धतीने महिला आयोगाने भूमिका मांडली त्याचा अर्थ असं उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन
आहे का? कायदा कायद्याचं काम करणारच आहे. आमचं शिंदे-फडणवीसांचं सरकार
(Shinde-Fadnavis Government) महाराष्ट्रात आहे. सरकार सरकारचं काम करणार आहेच.
मात्र महिला आयोगाला याबाबत काही वाटतं आहे की नाही? अशा पद्धतीचा नंगानाच हा महाराष्ट्रात आम्ही खपवून
घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) हा महाराष्ट्र आहे.
उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Chitra Wagh | is urfi javed walking naked on the streets acceptable to the womens commission bjp leader chitra wagh raised the question