
Chitra Wagh | ‘मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा’ ! गेली 25 वर्षे मराठी माणूस आणि मराठी माणसांच्या जीवावर राज्य करणाऱ्या बेगडी लोकांचे बेगडीपण समोर – चित्रा वाघ
मुंबई : Chitra Wagh | मुलुंड येथील शिवसदन सोसायटीत गुजराती लोकांनी तृप्ती देवरूखकर यांना मराठी असल्याने घर नाकारले होते. या घटनेची दखल घेत मनसेने सोसायटीचा सेक्रेटरी, चेअरमन यांना मनसे स्टाईल जाब विचारत माफी मागण्यास भाग पाडले होते. यानंतर राज ठाकरे यांनीही भाषणातून थेट इशारा दिला होता. दरम्यान, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तृप्ती देवरुखकर यांची भेट घेत घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. मात्र, वाघ यांनी यावेळी केलेल्या टीकेचा रोख शिवसेनेकडे होता, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Chitra Wagh)
मुंबईत तृप्ती देवरूखकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले की, गेली २५ वर्षे मराठी माणूस आणि मराठी माणसांच्या जीवावर राज्य करणाऱ्या बेगडी लोकांचे बेगडीपण समोर येत आहे का? कारण, गिरगाव, दादर, परळ आणि लालबाग येथून मराठी माणूस का आक्रसत गेला, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे, मराठी आमचा धंदा आणि निवडून द्या यंदा…अशाच पद्धतीची निर्लज्ज भूमिका मराठी मराठी म्हणवणाऱ्यांनी घेतली आहे. (Chitra Wagh)
चित्रा वाघ म्हणाल्या, आम्ही मराठी वाढवू आणि मराठी संस्कृतीही वाढवू.
जसे भारतात भारतीयता तसे महाराष्ट्रात मराठीयता टिकले पाहिजे. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे.
सरकारची भूमिका येणाऱ्या दिवसांत स्पष्टपणे नमूद केली जाईल. जे घडले त्याचे समर्थन नाही.
पण, आमचे लोकप्रतिनिधी हे मराठी, गुजराती ह्या सगळ्यांसाठीच काम करतात. सगळ्यांचीच मते त्यांना पडतात.
म्हणून सर्वधर्म समभाव घेऊन चालणारी भारतीय जनता पार्टी आहे.
एखाद्या घडलेल्या घटनेवरुन सगळेच त्या मानसिकतेचे असतील, असे म्हणणेही चुकीचे आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ही टीका अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर केल्याचे दिसत आहे.
यावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update