Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना शूर्पणखा संबोधलेलं नाही, असं स्पष्टीकरण भाजपच्या (BJP) उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलं आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज सकाळी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या विधानावरुन मोठी खळबळ उडाली होती. यावरुन चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

ट्विटमध्ये काय म्हटले ?

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला (State Women’s Commission) अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे.
अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ (shurpanakha) बसवू नका, अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. राजकीय रावणही राज्यात फिरत आहेत.
विशेषत: सत्ताधारी पक्षातील (ruling party) आमदार, मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे असतील त्यांच्यावर कित्येक केसेस पेडिंग आहेत.
त्यामुळे अशा रावणांना वाचवणाऱ्या शूर्पणखा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नकोत असं मी म्हटलंय, मी कोणाचही नाव घेतलेलं नाही.
येणाऱ्या दिवसांत कोणीही या पदावर बसू देत जे बसतील त्यांचं स्वागत आहे.
आम्ही यासाठी लढा पुकारला, वारंवार आंदोलनं केली, असे वाघ यांनी म्हटलं आहे.

त्या व्यक्तीनं पदाला न्याय देणं गरजेचं

राज्य महिला आयोगावर कोणाचं नाव घोषीत झालेलं मी ऐकलेलं नाही. त्या पदावर कोण व्यक्ती येतंय हे महत्त्वाचं नाही.
तर त्या पदावर आलेल्या व्यक्तीने त्या पदाला न्याय देणं गरणजेचं आहे.
नवरात्रीच्या उत्सवात (navratri utsav) देखील महिलांवरील अत्याचार कुठेही थांबलेले दिसत नाहीत.
त्यामुळं हा राज्यातील प्रत्येक महिलेच्या मनातील आक्रोश आहे आणि तो मी व्यक्त केल्याचे वाघ यांनी सांगितले.

 

ते ट्विट कोणाला उद्देशून नाही

मला असं वाटतं की, दिवसाढवळ्या रावण (Ravana) फिरत आहेत, असे किती रावण मी तुम्हाला सांगू.
या रावणांना वाचवणारी शुर्पणखा तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवू नका असं मी म्हटलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, मी जे ट्विट केलंय ते कोणाला उद्देशून केलेलं नाही.
पण माध्यमांनी मी चाकणकर बाईंना उद्देशून म्हटल्याच्या बातम्या चालवल्या.
त्या शूर्पणखा थोडीच आहेत. त्याचं नाव घोषीत झालेलं नसताना तुम्ही त्यांना कसं जाऊन विचारलं ? महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची गरीमा मला माहित आहे.
ते कुठल्याही पक्षाचं पद नाही तर संविधानिक पद आहे. त्यामुळे त्याचा आदर आहे, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.

 

Web Title : Chitra Wagh | not called shurpanakha to ncp leader rupali chakankar chitra wagh told in pc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP-Shivsena Alliance | ‘… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असते’, शिवसेनेच्या या दिग्गज मंत्र्याचं वक्तव्य

Foods for Vitamin C Deficiency | ‘व्हिटॅमिन सी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘हा’ भयंकर आजार, बचावासाठी सेवन करा ‘हे’ 8 फूड

Pune Crime | MPSC च्या क्लासला जाणार्‍या 26 वर्षीय विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग, हडपसर परिसरातील घटना