Chitra Wagh On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका, म्हणाल्या – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला…’

Chitra Wagh On Uddhav Thackeray | chitra wagh criticizes uddhav thackeray saying you are dragging a one and a half year old baby into politics
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh On Uddhav Thackeray | दसरा मेळाव्यात (Dasra Melava 2022) बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घराणेशाहीवर टीका करताना शिंदे यांच्या दीडवर्षाच्या नातवाचा सुद्धा उल्लेख केला. यावरून शिंदे यांनी आपल्या भाषणात त्यांचा संताप व्यक्त केला. शिवाय, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी एक खुले पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना सुनावले. मात्र, शिवसेना (Shivsena) – शिंदे गटाच्या (Shinde Group) या वादाला मनसे (MNS) आणि भाजपा (BJP) सुद्धा खतपाणी घालत असल्याचे दिसत आहे. मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा (Chitra Wagh On Uddhav Thackeray) साधला आहे.

 

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकला असून यात म्हटले
की, शिवसैनिक (Shiv Sainik) सोडून स्वत:ला मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा शिवसैनिक सोडून
स्वत:ला पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून स्वत:च्या मुलाला मंत्रीपद, एखाद्या महिला शिवसैनिकेला सोडून स्वत:च्या घरात संपादक पद.
माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात.
हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल?

 

चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात.
राजकारण इतक्या खालच्या पातळीला या अगोदर कधी गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.

 

Web Title :- Chitra Wagh On Uddhav Thackeray | chitra wagh criticizes uddhav thackeray saying you are dragging a one and a half year old baby into politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा पदभार स्वीकारताच धडाका, रुग्णालयात रात्री डॉक्टर नसल्यास थेट निलंबन, धाडसत्र सुरु

Pune Crime | लोनॲप” फसवणूक टोळीला ‘मोक्का’, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ‘मोक्का’ कारवाईचे ‘शतक’

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)