Chitra Wagh Promoted | भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषीत, चित्रा वाघ यांना बढती

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – Chitra Wagh Promoted | भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय (Bharatiya Janata Party) कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. कार्यकारिणीसाठी (BJP National Executive) निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. याबाबत घोषणा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश (जेपी) नड्डा (J.P. Nadda) यांनी केली आहे. या कार्यकारिणीच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला नेत्याचा समावेश आहे. त्यापैकी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh Promoted) यांना देखील संधी दिली आहे.

या आगोदर भाजप नेत्या (BJP) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेण्यात आलं. त्यानंतर आता चित्रा वाघ (Chitra Wagh Promoted) यांना भाजप पक्षाकडून मोठी संधी देण्यात आली आहे. दरम्यान, 80 जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती भाजपने जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील एकूण 8 नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केला गेला आहे.

गेल्या काही दिवसामध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh Promoted) या भाजपच्या (BJP) सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील सत्ताधा-यांना धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात होणारा राजकीय वादात त्या सतत आक्रमक होताना दिसल्या आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शिफारसीनुसार चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज,
बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…

Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी