राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्का : महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा राजीनामा ; ३० जुलैला भाजप प्रवेश ?

मुंबई : पोलीसनामा ऑनालईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी पक्षाला हा तिसरा मोठा धक्का आहे. सचिन अहिर, आमदार वैभव पिचड या महत्वाच्या नेत्यानंतर आता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिकिरीचा सामना करावा लागणार आहे. चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. अकोला विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे लवकरच भाजपमध्ये सहभागी होतील. चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे आमदार कालिदास कोलमकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड हे तिघेही ३० जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. उलासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी या देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त