Chitra Wagh | कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’ ! सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा; चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | राज्य सरकारकडून (State Government) देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटवरून (Family Planning Kit) राज्यातील वातावरण तापलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी (Population Control) या किटचं वाटप करण्यात येतं. मात्र बुलढाणा – कुटुंबनियोजन किटमध्ये रबरी लिंग दिल्याने मोठी खळबळ उडाली असून आशा सेविकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

बुलढाणा – कुटुंबनियोजन किटमध्ये रबरी लिंगाचा समावेश सरकारने करून त्याची जनजागृती (Awareness) करण्याचे काम आशा वर्करना दिलं आहे. भारतीय दंड विधान IPC 354 (Indian Penal Code 354) प्रमाणे (मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य) डोक्यावर पडलेल्या या ठाकरे सरकारवर विनयभंगाचा गुन्हा तात्काळ दाखल व्हावा, अशी मागणी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.

 

लोकसंख्या वाढीबाबत आशा सेविका (Asha Worker) घरोघरी जाऊन समोपदेशन करतात.
मात्र राज्य सरकारने दिलेल्या रबरी लिंगामुळे ते महिलांसमोर घेऊन कसं जाणार ? याचं प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी रबरी लिंग देण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून (Department of Health) सांगण्यात आले.
मात्र याप्रकरणाबाबत कॅमेरासमोर बोलण्याची तयारी दाखवली नाही.

 

दरम्यान, कुटुंब नियोजन किट एका जागेवरून दुसऱ्या जागी नेतानाही खूप विचित्र वाटतं.
कुटुंब नियोजनाच्या या कीटमध्ये पुरुष आणि महिला या दोघांच्या रबरी लिंगाचा वापर समावेश करण्यात आला असल्याचं आशा सेविकांनी सांगितलं. सरकारवर यामुळे जोरदार टीका होत आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | rubber model of organ in family planning kit given by state government to asha workers bjp chitra wagh angry on state govenment

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा